हिवाळा ऋतूमधील वातावरण हे सामान्य फ्लू (common influenza virus) पसरण्यासाठी पोषक असते, त्यात हल्लीच आपण कोरोना मधून रोगप्रतिकारशक्तीचे (immunity)महत्व समजलो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रोगप्रतिकारशक्तीकडे लक्ष द्यावे लागेल,निसर्गाने आपल्याला ऋतू नुसार जी काही फळं दिली आहेत तीच फळं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वरदान ठरतात.
आपण हिवाळ्यात कोणती 5 फळं आवरजून खावीत आणि का खावीत हे सविस्तरमध्ये बघु.
#१.डाळिंब:
डाळिंबाला वैज्ञानिक भाषेत Punica granatum म्हणून ओळखले जाते.
डाळिंब या फळामध्ये जीवनसत्व क (vitamin C) मोठया प्रमाणत आहे, तसेच डाळिंब अँटी ऑक्सीडन्टस ने देखील समृद्ध आहे. डाळिंबाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे.
डाळिंबातील सर्वात महत्वाचे संयुग म्हणजे अँथोसायनिन्स(anthocyanins) जे अँटीम्युटेजेनिसिटी, अँटीहाइपरटेन्शन, अँटी-ऑक्सिडेटिव्ह आहे, जे कॅन्सर पेशंटस् तसेच हृदय रोग्यांमधे गुणकारी ठरते.डाळिंबाचा रस आतड्यांवरील जळजळ (inflammation) कमी करण्यास मदत करते.
#२.पेरू:
पेरूचे वैज्ञानिक नाव Psidium guajava L. आहे.
पेरूमध्ये जीवनसत्त्व B6 आणि B3 भरपूर प्रमाणात असते, यांना अनुक्रमे पायरीडॉक्सिन आणि नियासिन म्हणतात .पेरूमध्ये फॉलिकआम्ल (folic acid)मुबलक प्रमाणात असते.इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये सर्वाधिक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेमध्ये फायदा मिळतो. पेरूच्या बिया गॅस आणि पचनाच्या समस्यांमध्ये फायदेशीर ठरतात.पेरूमध्ये कॅरोटीन, लाइकोपीन, व्हिटॅमिन ए आणि सी , इतर अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेशी संबंधित विविध समस्यांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.
पेरूच्या फळाबरोबरच पेरूच्या पानाचा देखील उपयोग जास्त प्रमाणात केला जातो,जसे कि यामध्ये असलेले पॉलिफेनॉल (polyphenol)हे कर्बोदकांचे शोषण(Carbohydrates absorption )नियंत्रित करतात, त्यामुळे डायबेटिक पेशंटस् ना पेरूच्या पानांचा चहा फायदेशीर ठरतो.
पॉलिफेनॉलसच्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे दात आणि हिरड्यांच्या समस्यांमध्ये देखील पेरूच्या पानांचा वापर होतो.
#३. स्ट्रॉबेरी:
स्ट्रॉबेरीला वैज्ञानिक भाषेत Fragaria X ananassa म्हणून ओळखले जाते.
स्ट्रॉबेरीमध्ये जनसत्त्व क (vitamin C) मोठ्या प्रमाणात आढळते.स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि फायटो केमिकल्स सांध्यांसाठी फायदेशीर ठरतात.
पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे उच्चरक्तदाबाच्या पेशंटसमध्ये फायदा मिळतो. मॅंगनीज हे खानिजद्रव्य स्ट्रॉबेरी मधून भेटते जे हाडांमध्ये कॅल्शियम शोषण (calcium absorption) वाढवायला मदत करते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात.
#४.संत्रा:
संत्र्याचे वैज्ञानिक भाषेत Citrus sinensis हे नाव आहे.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, कॅरोटीनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे बायोएक्टिव्ह वनस्पती संयुगे आणि अनेक खनिजे यांचा समावेश असतो.
संत्र्यामध्ये सायट्रिक ऍसिड जास्त प्रमाणात आढळते, सायट्रिक ऍसिड हे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते, मुरुम कमी करते. त्यातील व्हिटॅमिन सी शरीराला कोलेजन आणि इलास्टिन तयार करण्यास सक्षम करते त्यामुळे आपली त्वचा तजेलदार राहते.शरीरामधील दाह कमी करण्यास देखील संत्र्याचे सेवन केले जाते (anti-inflammatory properties). एकंदरीतच रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर संत्रे खाल्लेच पाहिजे.
#५.सीताफळ:
सीताफळाला वैज्ञानिक भाषेत Annona squamosa म्हणून ओळखले जाते.
या फळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त, तांबे, कॅरोटीनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या असंख्य पोषकतत्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा समावेश आहे.सीताफळामध्ये उच्च उष्मांक असते, ज्यामध्ये साधे फ्रक्टोज आणि ग्लुकोज असते, जे सहजपणे पचवले जाऊ शकते. आयुर्वेदानुसार सीताफळामध्ये अँटीपायरेटिक गुणधर्म आहे,त्यामुळे तापामध्ये शरीराचे तापमान कमी करण्यास मदत होते.
सीताफळ हे व्हिटॅमिन के आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे जे ऑस्टिओपोरोसिसपासून हाडांचे संरक्षण करून हाडांचे आरोग्य वाढवण्यास मदत करते.
तुम्ही रोजच्या आहारात ही फळं घेतलीत तर नक्कीच तुम्हाला याचे फायदे जाणवतील कारण तुम्ही बागितलात तर पाचही फळांमध्ये जीवनसत्व क (vitamin C), तसेच अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात आहेत जे नक्कीच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतील.