बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक जीवन आणि त्यातून येणारा ताण यामुळे तरुण व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुण वयात अचानक येणाऱ्या हृदयविकारांमागे असलेली कारणे आपण पुढे पाहू.
अनुवांशिक:
हृदयाशी निगडित आजार अनुवांशिकतेनुसार देखील येऊ शकतात, जसं की कोलेस्ट्रॉल ची अती पातळी, उच्च रक्तदाब,लठ्ठपणा.
जीवनशैली:
खराब आहारशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान आणि अति प्रमाणात मद्यपान यामुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढतो.एका रीपोर्टनुसार धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना, धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दुप्पट असते.
रासायनिक पदार्थाचा गैरवापर:
इथे आपण पदार्थांचा गैरवापर म्हणून नमूद करत आहोत, कारण मेडिकल सायन्स मध्ये (कायदेशीर) अश्या पदार्थांचा उपयोग चांगल्या कारणासाठी होतो, परंतु या पदार्थांचा जेव्हा आपण एक व्यसन(बेकायदेशीर) म्हणून उपयोग करतो तेव्हा ते अतिशय घातक ठरते. कोकेन आणि ॲम्फेटामाइन्ससारख्या औषधांच्या अतीवापरामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढताना दिसतो.
दीर्घकालीन स्थिती:
उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हायपरलिपिडेमिया यांसारख्या परिस्थितींचे योग्य व्यवस्थापन न केल्यास हृदयविकार होऊ शकतो.
लठ्ठपणा:
शरीराचे अतिरीक्त वजन, विशेषत: ओटीपोटात वाढलेली चरबी हा एक महत्त्वपूर्ण जोखीम घटक आहे. लठ्ठपणा हा जास्त रिस्क फॅक्टर ठरतो कारण यामुळे अप्रत्यक्षरीत्या शारीरिक हालचाल पण मंदावते किंवा कमी होते.
तणाव:
तणाव आणि नैराश्याचे उच्च प्रमाण हृदयविकाराशी संबंधित आहे.
जन्मजात हृदयविकार:
काही व्यक्तींना जन्मताच हृदयविकार असतो, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
एथेरोस्क्लेरोसिस:
रक्तवाहिन्या अकाली कडक झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रक्तवाहिनीच्या आतील बाजूस घट्ट चरबीचा थर जमा झाल्यामुळे ही परिस्थिती उदभवते,यासाठी अनेक देखील कारणे आहेत.
बैठी जीवनशैली:
नियमित शारीरिक हालचालींचा अभाव हृदयविकाराच्या अनेक जोखीम घटकांना कारणीभूत ठरतो. कॉम्प्युटर समोर तासान तास बसणे, शारीरिक व्यायाम न करणे,ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे हृदयविकारांना निमंत्रण देतात.
हृदयविकाराच्या धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल ,जसे की नियमित व्यायाम करणे, आहारात तेलाचे प्रमाण कमी करणे, दारू सिगारेट यासारख्या अमली पदार्थांपासून लांब राहणे, वैद्यकीय व्यवस्थापन आणि नियमित तपासण्या केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
हृदय सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आठवड्यातून किमान पाच वेळा तरी एरोबिक्स व्यायाम करावा तसेच रजिस्टन्स ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंग चे आठवड्यातून किमान तीन तरी सेशन असावेत. प्रत्येक प्रकारच्या व्यायामाआधी आणि नंतर स्ट्रेचिंग नित्य नियमाने करावी,या सर्व गोष्टींमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
खूप छान चांगली माहिती होती
Thanks