थंडीमध्ये खावा हेल्दी नाष्टा, मखाना!

     मखाना, ज्याला फॉक्स नट किंवा कमळाच्या बिया देखील म्हणतात, या बिया युरियाल फॉक्स (Euryale fox) वनस्पतीपासून मिळविल्या जातात.

वंश (genus)-युरियाल(Euryale)

कुटुंब(family)-वॉटर लिली फॅमिली (Nymphaeaceae)

  युरियाल फॉक्स ही वनस्पती पाण्यात वाढते, या वनस्पतीची पाने सपाट, मोठी, खोल शिरा असलेली गोलाकार असतात. भारत आणि पूर्व आशियाच्या काही भागांमध्ये या वनस्पतीची लागवड केली जाते.

      # मखाना खाण्याचे काही फायदे आपण बघू:

  • मखाना प्रथिने, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध आहे.
  • मखानामध्ये चरबी फार कमी आहे, त्यामुळे निरोगी स्नॅकिंगसाठी मखाना हा लोकप्रिय पर्याय आहे. 
  • मखाना मध्ये अत्यावश्यक अमीनो ऍसिड आढळतात, तसेच मखाना हे ग्लूटेन-मुक्त(gluten-free) देखील आहे.
  • मखान्याचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.
  • मखानामध्ये कमी-कॅलरी असल्यामुळे वजन व्यवस्थापनास मदत होते.
  • मखानामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचन सुधारते.
  • मखान्यातील कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे (मखाण्याचा GI 25 ते 37 च्या दरम्यान आहे) मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायी आहे. 
  • मखानामध्ये केम्पफेरॉल(kaempferol) नावाचे एक फ्लेव्होनॉइड आहे जे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास (anti-aging) मदत करते,म्हणजेच चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच केस गळणे यासारखी वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करते. 
  • मखाना यकृत डिटॉक्स करण्यास आणि प्लीहा(spleen) साफ करण्यास मदत करते.

हिवाळ्यामध्ये शरीराला पोषक अशी मखाण्याची रेसीपी आपण पाहू.

रेसिपी:

350 मिली दूध गरम करून घेऊन, त्यामध्ये मूठभर तुपात भाजलेले मखाने 10 मिनिटे भिजत घालावेत आणि  सकाळी नाष्ट्यामध्ये खावेत, हा एक अत्यंत आरोग्यदायी नाश्ता आहे ज्यातून आपल्याला प्रथिने,कर्बोदके,कॅल्शियम, मॅग्नेशियम इतर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स भेटतात,जे हाडांसाठी, स्नायूंसाठी मजबूती देतात.

    मखाना हा सामान्यतः चव विरहित असतो, आपण ज्या पदार्थांबरोबर त्याला मिसळतो त्याची चव त्याला प्राप्त होते.

Leave a comment