कॉफी आणि चहाचे आपआपले अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, परंतु चहा किंवा कॉफी या दोन्हींपासून मिळणारे फायदे हे काही आधारांवर अवलंबून आहेत जसे आपण चहा किंवा कॉफीचे किती सेवन करतो,आपले आरोग्य लक्ष्य (Health goal) काय आहे, आपली आरोग्य स्थिती कशी आहे.
आपण कॉफी आणि चहाचे सविस्तर फायदे आणि धोके खाली सविस्तरपणे पाहू.
@कॉफी
#फायदे-
अँटिऑक्सिडंट्सनी युक्त:
कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड, फिनोलिक कंपाऊंडस्,फ्लावोनॉइड्स असे अनेक अँटिऑक्सिडंटस् असतात ज्यामुळे फ्री रॅडिकल्स मुळे होणारी पेशींची झीज कमी होते.
मानसिक सतर्कता:
कॉफीमधील असणारे कॅफिन फोकस, एकाग्रता आणि ऊर्जा पातळी सुधारण्यास मदत करते.
शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी:
कॉफीमधील कॅफीन ऍथलीट्स आणि नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांना सतर्क आणि एकाग्र राहण्यास आणि थकव्याचे परिणाम कमी करण्यास मदत करते.
जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी:
नियमित कॉफीचे सेवन हे पार्किन्सन्स,अल्झायमर आणि टाइप 2 मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते.
#धोके-
जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने अस्वस्थता, चिंता सतावते किंवा झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो,कारण त्यात कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॉफीच्या अतिसेवनामुळे काही लोकांमध्ये रक्तदाब देखील वाढू शकतो.
4 ते 5 कप कॉफीचे सेवन (चहा पावडर ब्रँड वर आधारित)आपल्याला 400 मिलिग्राम कॅफिन प्रधान करते आणि बहुतेक निरोगी प्रौढांसाठी हे लिमिट सुरक्षित असल्याचे दिसून येते.400 मीलिग्राम च्या वरती सेवन झाल्यास वरील सर्व धोके अनुभवायला मिळतात.
@चहा
#फायदे-
चहामध्ये भरपूर असे प्रकार आहेत ज्यामध्ये साधा चहा,मसाला चहा,हर्बल चहा हे प्रामुख्याने बघायला मिळतात,प्रत्येक चहाचे आपापले अनेक फायदे आहेत,ते आपण थोडक्यात पाहू.
अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध:
चहामध्ये पॉलिफिनाईल्स, फ्लावोनॉइड्स, कॅटेचिन्स असे विविध अँटिऑक्सिडंट असतात जे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस(अप्रत्यक्षपणे पेशींची झीज कमी करतात) कमी करण्याचे काम करतात.
ग्रीन टी मध्ये विशेषतः कॅटेचिन्स (catechin) हे अँटीऑक्सिडंट असते, हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सपासून पेशींचे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते,तसेच वेदनाशमन करण्यामध्येहि लाभदायी ठरते.
इम्युनीटी बूस्टर:
साधा चहा अँटिऑक्सिडन्टस्ने युक्त असतोच,पण मसाला चहा मधे विविध आयुर्वेदिक मसाले टाकले जातात,जसे लवंग,अद्रक,अश्वगंधा,गवती,दालचिनी जे दाहक विरोधी आणि बॅक्टेरिया प्रतिबंधक म्हणून काम करतात,त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
कॅफिनची कमी मात्रा:
चहामध्ये सामान्यतः कॉफीपेक्षा कमी कॅफीन असते, ज्यामुळे ते मज्जासंस्थेवर सौम्य परिणाम करते त्यामुळे झोपेच्या सायकलमधे व्यत्यय येत नाही.
पाळीच्या दिवसांमध्ये वेदनाशामक:
कॅमोमाईलच्या(chamomile) फुलांचा चहा हा पाळीच्या वेदना शमवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.
#धोके-
अतिरिक्त चहा धोकादायक आहे कारण यामध्ये असणाऱ्या कॅफिनच्याओव्हरडोसमुळे चिडचिड,भितिदायकपणा,डोकेदुखी आणि पोटाचे विकार होऊ शकतात.चहा हा डायउरेटिक (Diuretic) आहे त्यामुळे अतिरिक्त चहाच्या सेवनाने बॉडी डीहायड्रेट होते.
एक गैरसमज आहे कि दूध टाकून चहा किंव्हा कॉफी घेऊ नये पण वैज्ञानिक दृष्ट्या बघता दुधामधील प्रोटीन कैसिन (casein) हे चहा, कॉफी मधील अँटिऑक्सिडंट्स बरोबर रिॲक्ट होऊन त्यांची परिणामकारकता थोडीफार कमी करते,पण त्यामुळे नुट्रिशनल व्हॅल्युमध्ये एवढा काही फरक पडत नाही,पण ॲसिडिटीचा त्रास असणऱ्यांनी शक्यतो चहा किंवा कॉफीमधे दूध मिसळणे टाळावे कारण यामुळे त्यांना हायपर ॲसिडिटीचा अनुभव येऊ शकतो.