खावा आरोग्यदायी फळ, avocado!

ॲव्होकॅडो (avocado) हे, नाशपातीच्या आकाराचे एक फळ आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव  Persea americana आहे, (Family- Lauraceae) .

या फळाची त्वचा खडबडीत किंवा पातळ देखील असते, तसेच रंग गडद हिरवा, लालसर-जांभळा किंवा  हिरवा -पिवळा असतो, ही विभिन्नता त्यांच्या वेगवेगळ्या जातींमुळे असते. हे फळ प्रामुख्याने दक्षिण-मध्य मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथून आलेले आहे. भारतात तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, आणि पूर्वेकडील हिमालयीन राज्यात  देखील  मर्यादित प्रमाणात या फळाचे उत्पादन घेतले जात आहे. हे फळ  पिकल्यानंतर किंचित गोड लागते,  पण चव सोडता या फळात भरपूर सारे औषधी गुणधर्म आहेत.

पोषक तत्वांनी समृद्ध: एवोकॅडोमध्ये( Avocado) मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत, ज्यात जीवनसत्त्वे A, E, C, B5, B6, B1,B2,B3 फोलेट तसेच खनिजे जसे की पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगनीज, तांबे, लोह, जस्त, फॉस्फरस आढळतात.

त्वचेचे आरोग्य: एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन E आणि C मोठ्या प्रमाणात आढळते, जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तसेच तीव्र उन्हामुळे त्वचेचे होणारे नुकसान  कमी करण्यासाठी मदत करते.एकंदरीत त्वचेच्या आरोग्यासाठी avocado उपयुक्त आहे.

एवोकॅडोच्या बी मध्ये देखील अँटीबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुणधर्म आहेत, त्यामुळे एवोकॅडोच्या  बियांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास पुरळ आणि इतर इन्फेक्शन लवकर बरे होतात.

हृदयाचे आरोग्य: एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे(mono unsaturated fats) प्रमाण जास्त असते, उदाहरणार्थ ओलिक ॲसिड(Oleic acid), जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे  LDL कोलेस्टेरॉलची(bad cholesterol)पातळी कमी करण्यास आणि  HDL कोलेस्ट्रॉल(good cholesterol)वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

ब्लड प्रेशर रेग्युलेशन: ॲव्होकॅडोमध्ये असलेले मुबलक पोटॅशियम, सोडियमच्याप्रभावांना संतुलित करून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.(अति प्रमाणात सोडियम सॉल्ट खाल्ल्यास ब्लड प्रेशर वाढण्याचे धोका असतो, या उलट पोटॅशियमचे सेवन रक्तवाहिन्यांचे स्नायू  शिथिल करण्यास मदत करते, परिणामता ब्लड प्रेशर कमी होतो.)

हाडांचे आरोग्य: एवोकॅडो मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन K प्रदान करते, जे  हाडांचे खनिजीकरण(mineralization  of bones)सुधारण्यास मदत करते,त्यामुळे हाडे मजबुत होतात. 

अँटिऑक्सिडंट्स:Avocado मध्ये ल्युटीन(lutein) आणि झेक्सॅन्थिन(zeaxanthin)सारखे अँटिऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, त्यामुळे मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका कमी होऊ शकतो.

अँटी-इन्फ्लमेटरी गुणधर्म: एवोकॅडोमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये दाहक-विरोधी (Anti-inflammatory)गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे संधिवात सारख्या जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो

Leave a comment