Heat wave: उष्णतेची लाट भारताला हानिकारक? याची कारणे आणि यामुळे होणाऱ्या उष्माघातापासून आपला बचाव कसा करावा!

  उष्णतेची लाट ही काही आपल्यासाठी नवीन नाहीये दरवर्षी  आपण उन्हाळ्यात या लाटेचा अनुभव घेतो, परंतु हळूहळू उष्णतेची तीव्रता वाढत चाललेली आहे.

Heat wave म्हणजे काय?

   Heat wave, उष्णतेची लाट म्हणजे तापमान सरासरी तापमानापेक्षा 3.5 ते 4.0 डिग्री सेल्सिअसने वाढते.मैदानी भागात हे तापमान 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोचते,तर समुद्रसपाटीजवळपास 35 डिग्री सेल्सिअस आणि डोंगराळ भागात 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोचते. 

     Heat wave मध्ये वातावरणातील हवेचा दबाव वाढतो, यामुळे सूर्यापासून येणारी उष्णता ट्रॅप होते त्यामुळे heat displacement(convection) वरच्या दिशेने होत नाही , परिणामता सभोवतालचे वातावरण अतिशय गरम होते ,आणि जमीन देखील उष्णता शोषून घेते त्यामळे उन्हाचा प्रहर गेला तरी गरमी काही कमी होत नाही.

Heat wave मध्ये उष्णतेची तीव्रता वाढण्याची कारणे 

    ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षी पृथ्वीचे तापमान काही औंशांनी वाढतच चालले आहे.

    भारतामध्ये 50% पेक्षा जास्त वीज ही  कोळश्यापासून बनवली जाते ज्यामधे CO2 evolution मोठ्या प्रमाणात होते.

    एयरकंडिशनसचा अती प्रमाणात वापर त्यामुळे उत्सर्जित होणाऱ्या CHCLF2, जो ओझोन थर deplete करण्यास कारणीभूत ठरतो आणि या इंडस्ट्री मध्ये विजेचा वापर पण जास्त प्रमाणत होतो.

  या तीव्र उष्णतेमुळे उष्माघात होण्याची उदाहरणे भरपूर पाहायला मिळतात,यामुळे दरवर्षी भारतात कितीतरी बळी जातात.

   उष्माघातामध्ये तीव्र डोके दुखी,उलटी,स्नायू दुखणे पायांना गोळे येणे,चक्कर येणे ही लक्षणे दिसतात.

उष्माघातापासून आपला बचाव कसा करावा.

  उष्माघातापासून आपला बचाव कसा करावा हे आपण खाली सविस्तर मध्ये बघू.

1.सतत पाणी पीत रहावे,दर चार तासांनी जर लघवीला होत नसेल तर आपल्या शरीरातील पाणी कमी होत आहे,हे indication लक्षात घेऊन पाणी सतत पीत राहावे.

2. तीव्र उष्णतेमुळे शरीरातले electrolytes कमी होतात,त्यामुळे लिंबूपाणी सैंधव मीठ टाकून पिने उत्तम.

3.muscle spasm रोखण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण नियंत्रण ठेवावे , केळी पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे.

4. दुपारी 12 ते 4 बाहेर उन्हामध्ये जाणे शक्यतो टाळावे.

5. उन्हामध्ये बाहेर निघताना स्कार्फ, सुती सैल कपडे घालावीत. गडद,ढळक रंगाची कपडे घालने टाळावीत.

    आपण उष्माघातापासून वाचू शकतो परंतु उष्णता कमी करण्यासाठी आपण ठोस पाऊले उचलले पाहिजेत , ग्रीन हाऊस गॅसेसच प्रमाण आटोक्यात ठेवले पाहिजे,तसेच म्होठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे.

Leave a comment