ॲसिडिटी झाली आहे, सोडा न घेता करा घरगुती उपाय!

सोडा पिणे, विशेषत: कार्बोनेटेड शीतपेये ॲसिडिटीपासून मुक्त होण्याचा चांगला असा मार्ग नाहीये.

खरं तर, काही लोकांमध्ये ॲसिडिटीची लक्षणे सोड्यामुळे अजून वाढतात. सोडा ॲसिडिटीमध्ये तात्पुरती मदत करू शकतो,कारण सोड्या मधील कार्बोनेशनमुळे आपल्याला ढेकर येतो, ज्यामुळे आम्ल रिफ्लक्स(Acid Reflux) तेवढा कमी होतो.

याउलट सोडा,त्यामधील असणाऱ्या कारबोनिक ॲसिडमुळे पोटातील ॲसिड चे प्रमाण वाढवतो. बऱ्याचशा सोड्यांचा/ साखरयुक्त सोड्यांचा पीएच कमी असतो,म्हणजेच त्यातील अँसिडचे प्रमाण जास्त असते,याचा अर्थ ते स्वतःच आम्लयुक्त(acidic) असतात, ज्यामुळे पोटाच्या अस्तरांना(stomach lining) आणि अन्ननलिकेला त्रास होऊ शकतो.तसेच साखरयुक्त सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण देखील जास्त असते त्यामुळे रोजच्या सेवनाने वजन वाढण्याचा ,तसेच टाईप 2 डायबेटिस होण्याचा धोका वाढतो.साखरयुक्त सोड्यामधे ग्लुकोज आणि फ्रक्टोसचे मिश्रण असते ज्यातील फ्रक्टोस हे लिव्हरद्वारे मेटाबोलाइज केले जाते,आणि अतिफ्रक्टोस चे रूपांतर लिव्हर फॅटसेल्समध्ये करते,त्यामुळे साखरयुक्त सोडा दररोज घेतला तर फॅटी लिव्हर होण्याची शक्यता वाढते.

ॲसिडिटी मध्ये करा घरगुती उपाय:

1.सगळ्यात आदि पहिला उपाय म्हणजे एक ग्लास पाणी प्या यामुळे पोटातील आम्ल पातळ(dilute) होते आणि पचनक्रिया शांत होण्यास मदत होते.

2.अद्रकचा छोटा तुकडा चाऊन खाल्ल्यास पोटातील आग कमी होण्यास मदत होते.

3.थंड दूध ॲसिडिटीमध्ये लाभदायक ठरते कारण त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम मुळे पोटातील ph संतुलित करायला मदत होते.

4.जेवल्यानंतर एक गुळाचा खडा खाल्ल्यावर देखील ॲसिडिटीमध्ये आराम मिळतो.

5.लवंग देखील ॲसिडिटी मध्ये लाभदायक ठरते, त्यामधे आढळणाऱ्या युगेनोल(eugenol) संयुगामुळे पोटातील आम्लता कमी होते आणि परिणामतः छातीतील जळजळ कमी होते.

6.घरात खाण्याचा सोडा/बेकिंग सोडा(सोडियम बायकार्बोनेट) ठेवावा जो ॲसिडिटीमध्ये अत्यंत गुणकारी आहे.

7.ओव्हर-द-काउंटर भेटणारे अँटासिड्स ॲसिडिटी मध्ये चांगला परिणाम दाखवतात जे सिरप आणि गोळ्यांच्या स्वरूपात मिळतात, यामध्ये साधारणपणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड ही संयुगे असतात.

8.आले किंवा कॅमोमाइलच्या फुलांचा चहा, पचनास मदत करण्यासाठी आणि ॲसिड रिफ्लक्स कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे.

ॲसिडिटीमध्ये आहारामध्ये काय घ्यावे:

-आहारामध्ये संपूर्ण धान्य जसे की ओटस् चे जाडे भरडे पीठ, तपकिरी तांदूळ,साधा तांदूळ घ्यावा ज्याने अधिक ॲसिड स्त्रावले जात नाही आणि त्यामुळे पोटाला आराम भेटतो.

-आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फरसबी, ब्रोकोली तसेच सलाडचा समावेश करावा.

-फळांमध्ये अम्लीय नसलेले(non-acidic) फळे जशी केळी,टरबूज घ्यावीत.

तुम्हाला वारंवार आम्लपित्त किंवा ऍसिड रिफ्लक्सचा अनुभव येत असल्यास, योग्य उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमी चांगले.

Leave a comment