शेवगा (moringa), शास्त्रीय नाव- Moringa oleifera(family-Moringaceae), हे एक लहान पानझडी वृक्ष आहे,याचे मूळ उष्णकटिबंधीय आशियातील आहे परंतु आफ्रिका आणि उष्णकटिबंधीय अमेरिकेतही नैसर्गिकृत उगवले जाते. या झाडाच्या शेंगा,फुले पाने ,डहाळ्या,साल, खोड मानव हितासाठी वेगवेगळ्या दृष्टीने उपयोगी आहेत.
शेवग्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग आपण खाली सविस्तरपणे पाहू!
#शेवग्याची पाने:
– शेवग्याच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन,फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम,विटामिन ए ,विटामिन सी, विटामिन ई मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे पूरक आहाराच्या यादीत शेवगा अग्रस्थानी आहे.यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे इम्यून सिस्टम (immune system)मजबूत होण्यास मदत होते.
– शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सीडेंट, अँटी-इन्फ्लमेटरी आणि अँटी-बैक्टीरियल गुणधर्म असतात. त्यामुळे हे विविध प्रकारच्या आजारांवर उपयोगी पडते.
– शेवग्याचे सेवन रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
– शेवग्याच्या पानांचा रस त्वचेला लावल्यास त्वचेची चमक वाढते तसेच केसांच्या आरोग्यासाठी देखील शेवग्याचे सेवन फायदेशीर ठरते.
– डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी शेवग्याचे पानांची भाजी फायदेशीर आहे कारण हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
#शेवग्याची फुले:
– शेवग्याची फुले यकृताचे ऑक्सिडेशन आणि विषारीपणापासून(toxicity) संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात कारण शेवग्याच्या फुलांमध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते,जे anti-ageing आणि anti oxidant म्हणून काम करते.
– शेवग्याच्या फुलांपासून मिळालेले तेल सुगंधोपचार आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते.
– शेवग्याची फुले मधमाश्या आणि इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांना आकर्षित करतात, ज्यामुळे झाडांचे आणि आसपासच्या वनस्पतींचे परागीकरण होते आणि जैवविविधतेला समर्थन मिळते.
– परंपरागत औषधांमध्ये शेवग्याच्या फुलांचा उपयोग सूज(inflammation), मूत्राशयाचे संक्रमण(urinary tract infection), आणि सर्दीच्या लक्षणांवर केला जातो.
#साल:
– शेवग्याच्या झाडाची साल दोरी बनवण्यासाठी,तसेच चटई बनवण्यासाठी वापरली जाते.
– सालीला येणारा डिंक खाण्यासाठी वापरला जातो त्याच्या प्रोबायोटिक गुणधर्मामुळे लहान आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरियांची वाढ होण्यास मदत होते. त्याला असणाऱ्या चिकटपणामुळे डींकाचा गोंद म्हणून देखील वापर होतो.
– खोडाच्या सालीचा वापर नैसर्गिक रंग तयार करण्यासाठीही होतो, ज्याचा वापर वस्त्र, खाद्य पदार्थ आणि सौंदर्यप्रसाधने यामध्ये होतो.
#शेवग्याच्या शेंगा आणि बिया:
– शेवग्याच्या शेंगांचा उपयोग खाण्यामध्ये सर्रास केला जातो.
– शेंगांमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी(free radicals)लढा देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
– शेंगांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस ची मात्रा अधिक प्रमाणात असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम खुराक आहे.
– मोरिंगा बिया विविध यंत्रणांद्वारे उच्चरक्तदाबासाठी सहायक म्हणून काम करत असल्याचे दिसून आले आहे . हायपरटेन्सिव्ह उंदरांच्या वर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की शेवग्याच्या बियांचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब, एस क्रियाकलाप(ACE activity),ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर, लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात, जे त्यांच्या अँटीहाइपरटेन्सिव्ह गुणधर्मांना सूचित करतात.
– शेंगांच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत होते कारण हे बॅड कोलेस्ट्रॉल(LDL Cholesterol)आणि ट्रायग्लिसराईड(triglycerides )ची पातळी कमी करते.
#शेवग्याचे खोड:
– शेवग्याचे लाकूड नरम आणि लवचिक असल्याकारणाने पेपर इंडस्ट्री मध्ये पेपर ,टिश्यू आणि इतर वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते.
– शेवग्याचे खोड जाळून ते तुम्ही खत म्हणून देखील वापरू शकता कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि फॉस्फरस आहे.
हे आहेत शेवग्याच्या प्रत्येक भागाचे (पान, फळ, फुल, साल खोड) औषधी आणि इतर फायदे, म्हणूनच आपण शेवग्याच्या झाडाला जादुई झाड (Miracle tree🍀)असे संबोधतो.