हलीम!
हलीम ,ज्याला आळीव सीड्स किंवा गार्डन क्रेस सीड्स म्हणूनही ओळखले जाते. हलीम ही ब्रॅसिकॅसी कुटुंबातील (belongs to Brassicaceae family) खाद्य औषधी वनस्पती आहे. ही इजिप्त मधून आलेली वनस्पती आहे, आणि आता याची लागवड जगभर केली जाते.
प्राचीन काळापासूनच हलीम त्याच्या गुणकारी फायद्यांमुळे जगभरात लोकप्रिय आहे. हलीम हे कॅन्सर, त्वचा विकार,केसांची वाढ, हृदयविकार, मधुमेह अशा अनेक आजारांमध्ये लाभदायक आहे.
हाडांच्या आरोग्यामध्ये हलीमच्या बिया महत्त्वाची भूमिका बजावतात, हलीम आपल्या हाडांसाठी का अतिशय उपयुक्त आहे हे आपण सविस्तर मध्ये पाहू.
कॅल्शियम समृद्ध(calcium rich):
हलीम बिया, कॅल्शियमचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे हाडे आणि दात मजबूत राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. पुरेशा प्रमाणात केलेले कॅल्शियमचे सेवन ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांचे विकार टाळण्यास मदत करते.
मॅग्नेशियम आणि फॉस्फरस(Mg ang P):
हलीम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील प्रदान करतात, जे हाडांच्या निर्मितीसाठी आणि मजबुतीसाठी उपयुक्त ठरतात.
प्रथिनांचे उच्च प्रमाण(high in protein):
या बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते, जे हाडांच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन के(vitamin K):
हलीम बिया हा व्हिटॅमिन केचा चांगला स्रोत आहे, जो हाडांच्या चयापचयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि हाडांची घनता राखण्यास मदत करते.
ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्(omega 3 fatty acid):
या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड असते, ज्यात दाहक-विरोधी(anti inflammatory) गुणधर्म असतात जे हाडांचे अवशोषण कमी करण्यास आणि हाडांची घनता सुधारण्यास मदत करतात.
हलीम बियांचे सेवन आपण पदार्थांवर टॉपिंग करून , पाण्यामध्ये रात्रभर भिजवून, एक कप कोमट दुधामध्ये भिजवून करू शकतो.
हळीम एनर्जी ड्रिंक: एक कप पाण्यामध्ये दोन चमचा हलीम सीड्स टाकून त्यामध्ये अर्धा लिंबू पिळा, लिंबू हे विटामिन सी ने भरपूर असल्याकारणाने हलीम मधील लोह (iron) शरीरामध्ये शोषण (absorption) होण्यास मदत होते, हे तुम्ही हप्त्यातून तीनदा घेऊ शकता, किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करू शकता.