त्वचेचे प्रकार आणि आयुर्वेदिक उपाय विशेषतः व्यक्तिगत आहेत.विभिन्न प्रकारची त्वचा आणि त्यावर काही आयुर्वेदिक सूत्रे खूप मदत करतात. त्वचेचे मुख्यतः चार प्रकार आहेत.
सामान्य त्वचा (Normal Skin): या प्रकारात त्वचा सतेज, मऊ आणि संतुलित असते. ही त्वचा नेहमी स्वच्छ आणि आरोग्यदायी दिसते.
तैलयुक्त त्वचा (Oily Skin): या प्रकारात त्वचा तेलकट आणि चमकदार दिसते. तैलग्रंथी अधिक प्रमाणात तैल उत्पन्न करतात, ज्यामुळे मुरुम आणि ब्लॅकहेड्स होण्याची शक्यता वाढते.
कोरडी त्वचा (Dry Skin): या प्रकारात त्वचा कोरडी, कडक आणि खाजवणारी असते. या त्वचेला आद्रतेची कमी असते आणि थंड हवामानात आणखी कोरडी होऊ शकते.
संवेदनशील त्वचा (Sensitive Skin): या प्रकारात त्वचा शारीरिक आणि वातावरणीय बदलांना लवकर प्रतिसाद देते,त्वचा लवकर लाल होते आणि खाजवते. या प्रकारच्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
आता आपण प्रत्येक त्वचेच्या प्रकारामध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी थोडक्यात, सहज सोपे आयुर्वेदिक उपाय आणि सोबतच आहार कसा असावा हे बघू.
सामान्य त्वचा (Normal Skin):
सामान्य त्वचेसाठी साधी आणि नैसर्गिक उत्पादने वापरा. रोज रात्री कच्च्या दुधाने चेहरा साफ करा आणि रोज सकाळी ताजे स्वच्छ पाणी वापरून चेहरा धुवा, यामुळे त्वचा तजेलदार दिसते.
आहारामध्ये जास्त तेलकट किंवा जास्त कोरडे पदार्थ खाऊ नयेत, आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश असावा.
तैलयुक्त त्वचा (Oily Skin):
तैलयुक्त त्वचेमध्ये कडुलिंबाच्या पानाची पेस्ट किंवा चंदन पावडर वापरून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी. मुठभर बेसन आणि हळदीचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होऊन चेहरा उजळतो.
आहारामध्ये तळलेले आणि मसालेदार अन्न पदार्थ टाळा, तसेच गोड पदार्थ कमी खावा.
कोरडी त्वचा (Dry Skin):
या त्वचेच्या प्रकारामध्ये त्वचा निसर्गतः कोरडी असल्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे.खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने चेहऱ्याची मालिश केल्यामुळे त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होते.
आहारामध्ये तूप, दूध आणि दही यांचा समावेश करावा.पाण्याचे सेवन वाढवावे.
संवेदनशील त्वचा (Sensitive Skin):
या प्रकारच्या त्वचेमध्ये गुलाबजल किंवा एलोवेरा जेल वापरून चेहरा साफ कराव. कुंकुमादी तेल लावणे अतिशय फायदेशीर ठरते.
आहारामध्ये ताजी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करा.मसालेदार आणि संसर्गजन्य अन्नपदार्थ टाळा.
या ब्लॉग मध्ये आपण त्वचेचे प्रकार आणि आयुर्वेदिक उपयांबद्दल थोडक्यात माहिती घेतली पुढील येणाऱ्या ब्लॉग्जमदे आपण प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी सविस्तर पणे स्किन केअर रूटीन तसेच स्किन केअर टिप्स पाहू.
आयुर्वेदिक उपाय प्रभावी ठरू शकतात, परंतु योग्य तपासणी करून आणि वैयक्तिक त्वचेशी सुसंगत असलेल्या उपायांचा उपयोग करणे महत्वाचे आहे.